Thursday, 14 December 2017

Mahastudent Application

पायाभूत चाचणी व संकलित मुल्यमापनचे गुण भरण्यासाठी Mahastudent नावाचा app सुरू करण्यात आला आहे, लिंक द्वारे Download करावे व Manual प्रमाणे वर्ग शिक्षकांने गुण भरावे...


   





How to Use Mahastudent Application
⬇️Click On Watch This Video⬇️

पायाभूतपरीक्षा मार्क मोबाईल App च्या  साहाय्याने 
भरणे MahaStudent App आपल्या मोबाईल 
ला रजिस्टर होत नाही.तर असा बदल करा..
Number already exits असे Problem 
येणार नाहीत..
How to Change / Update Mobile Number On Student Portal 
⬇️Click On Watch This Video⬇️

  • पायाभूत व संकलीत चाचणीचे गुण Student पोर्टल मध्ये भरण्यासाठी MahaStudent App उपलब्ध करून दिल्याबाबतची सूचना

विद्यार्थ्याच्या प्रगतीचे मूल्यमापन करण्यासाठी शैक्षणिक सत्रांमध्ये घेतल्या जाणाऱ्या पायाभूत व संकलीत चाचणीचे गुण Student पोर्टल मध्ये मोबाईलद्वारे सुलभरीत्या भरता यावे यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून सरल student पोर्टल बरोबरच MahaStudent  हे Android App देखील उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

➡ MahaStudent  हे Android App आपण कोठून Download/Install करून घ्याल ?

MahaStudent  हे Android App फक्त Google Play Store वर उपलब्ध करून दिलेले आहे,याची सर्वांनी नोंद घ्यावी.सदर अँप हे student पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेले नाही हे लक्षात घ्यावे.आपल्या Android मोबाईल मध्ये असलेल्या Play Store मध्ये जाऊन Mahastudent असा शब्द टाकून सर्च करावे.त्यानंतर दिसून येणाऱ्या अँप च्या लिस्ट मध्ये आपणास Mahastudent,eGov Mobile App अशा नावाचे अँप दिसून येईल.हे अँप आपण आपल्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करून घ्यावे.


➡ टीप: MahaStudent  हे Android App इन्स्टॉल केल्यानंतर रजिस्ट्रेशन प्रोसेस करताना आपल्या मोबाईलचे Location चे बटन चालू म्हणजेच On असणे आवश्यक आहे,अन्यथा आपले अँप रजिस्ट्रेशन झाल्यावर आपणास काही टॅब मध्ये काम करताना अडचण येऊ शकते.एकदा आपले रजिस्ट्रेशन पूर्ण झाले की त्यानंतर आपण आपले Location चे बटन बंद करण्यास हरकत नसेल,हे लक्षात घ्यावे.

या अँप च्या मदतीने प्रत्येक वर्गशिक्षक आपल्या वर्गातील विद्यार्थ्याचे पायाभूत व संकलीत चाचणीमध्ये त्यांना मिळालेले गुण नोंदवू शकणार आहे.या अँप चे मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे कमीत कमी इंटरनेट चा वापर हा आहे. हे अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करताना फक्त इंटरनेट ची गरज भासते.एकदा हे अँप आपल्या mobile मध्ये इन्स्टॉल झाले की,त्यानंतर हे अँप संपूर्णपणे ऑफलाईन(इंटरनेट शिवाय) सुरू असते.त्यानंतर फक्त  जेंव्हा आपली माहिती भरून पूर्ण होईल त्यावेळी आपण offline ने भरलेली माहिती student पोर्टल च्या सर्वर ला पाठवताना (सिंक करताना) इंटरनेट ची दुसऱ्या वेळी गरज भासते.एकंदरीत या अँप द्वारे माहिती सर्वर ला पाठवताना अगदी काही किलोबाईट इंटरनेट डेटा ची गरज भासते जी अगदी नगण्य आहे.त्यामुळे अधिक खर्चिक इंटरनेटची गरज भासणार नाही असे म्हणता येईल.नगण्य इंटरनेट चा वापर करून संपूर्ण माहिती ऑफलाईन पद्धतीने भरता येण्याची सुविधा देणारे हे देशातील पहिले शैक्षणिक अँप महाराष्ट्र शासनाने NIC, पुणे च्या मदतीने तयार केले आहे.

आवाहन: सर्व शिक्षक बांधवांना विनंती आहे की,या अँप मध्ये सध्या दिलेल्या सुविधेव्यतिरिक्त काही अधिकच्या सुविधा,रिपोर्ट आपणास आवश्यक आहेत का याबाबत या अँप मधील Feedback या बटनाला क्लीक करून आम्हाला कळवा,जेणेकरून त्याप्रमाणे MahaStudent अँप च्या पुढील व्हर्जन मध्ये आपणास योग्य तो बदल करता येऊ शकेल.

 या अँप च्या मदतीने आपणास विद्यार्थ्याच्या गुणांव्यतिरिक्त विद्यार्थ्याची दैनंदिन उपस्थिती देखील नोंदवता येणार आहे हे लक्षात घ्यावे.अशा या आगळ्यावेगळ्या अँप चा वापर कसा करावा हे समजून घेण्यासाठी तसेच या अँप मधील इतर वैशिष्टांबाबत अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक ला क्लीक करा व Mahastudent App बाबत सविस्तर माहिती जाणून घ्या.