Advertisement for Maha TAIT
How to Register Mahatait
How to fill the application form
How to Register in Tait
सूचना
कृपया सगळ्या सूचना वाचा आणि मग अर्ज भरा.
सूचनाः
महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी -2017 चे अर्ज भरण्याबाबत सूचना
अर्जामध्ये खालील टप्पे आहेतः
नोंदणी
अर्जावरील माहितीचा प्रिव्ह्यू
ऑनलाईन शुल्क भरणा
अर्जाची प्रिंटआऊट
कृपया अर्जासंबंधी खालील सूचना पहा
उमेदवाराला www.mahapariksha.gov.in या संकेतस्थळावर लॉगइन करावे लागेल.
उमेदवाराला आपल्या उजव्या बाजूला असलेल्या ‘सूचना’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
तिथून उमेदवाराला थेट नोंदणीच्या पोर्टलवर नेले जाईल.
पहिल्यांदाच नोंदणी केली जात असल्यास उमेदवाराला नोंदणीच्या पर्यायावर क्लिक करून यूजर नेम, पासवर्ड आणि इमेल आयडी टाकावा लागेल.
उमेदवाराला त्यानंतर त्याच्या/तिच्या प्रमाणित इमेल आयडीवर सक्रीयतेची लिंक मिळेल जी त्यांच्या साइनअपशी संबंधित असेल.
उमेदवाराला त्याचे/तिचे खाते सक्रीय करण्यासाठी त्याच्या/तिच्या इमेल आयडीवर मिळालेल्या सक्रीयतेच्या लिंकवर क्लिक करावे लागेल.
उमेदवाराने त्याची/तिची लॉगइनची माहिती गोपनीय ठेवणे अपेक्षित आहे. एकदा खाते सक्रीय झाले की, उमेदवाराला त्यांच्या नोंदणी पोर्टलचे युजरनेम आणि पासवर्ड वापरून केव्हाही लॉग ऑन होता येईल.
उमेदवाराचे नाव, वडिलांचे/पतीचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, जन्मदिवस, मोबाइल क्रमांक, छायाचित्र, स्वाक्षरी ही मुलभूत माहिती आहे जी उमेदवाराला विस्तृतपणे द्यावी लागेल.
छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करण्यासंबंधी माहिती :
कृपया उंची आणि रुंदी प्रत्येकी २०० पिक्सल असलेले छायाचित्र स्कॅन करून अपलोड करा. छायाचित्राचे आकारमान २०केबी ते ५० केबीच्या दरम्यान असावा.
५x४.५ सेमीचा एक आयत काढा.
त्या आयतामध्ये काळ्या पेनने स्वाक्षरी करा.
ती प्रतिमा स्कॅन करा आणि अर्जामध्ये अपलोड करा.
प्रतिमेची उंची ६० पिक्सल आणि रुंदी १४० पिक्सल असावी.
प्रतिमेचे आकारमान २० केबी ते ५० केबीच्या दरम्यान असावे.
पत्ता टाकण्यासाठी उमेदवाराने आपल्या पत्त्याचा प्रकार निश्चित करावा. उदा. कायमस्वरूपी पत्ता, तात्पुरता पत्ता किंवा दोन्ही आणि त्यानुसार आपले गाव, पोस्ट ऑफीस, राज्य, जिल्हा, पिन कोड इ.सहित भरावा.
त्यानंतर उमेदवाराने अतिरिक्त माहितीच्या पर्यायावर क्लिक करावे आणि आपल्या जात संवर्गाबद्दल माहिती भरावी.
उमेदवाराला जात प्रमाणपत्र असल्यास त्याबद्दल विचारणा केली जाईल. असल्यास ड्रॉपडाऊन मधून त्याने/तिने आपला जात संवर्ग निवडावा.
ज्यांच्याकडे आधार क्रमांक आहे त्यांनी तत्संबंधी माहिती टाकावी.
उमेदवाराकडे आधार क्रमांक नसल्यास त्याने/तिने आधारकरिता नोंदणी करून त्यांचा आधार नोंदणी क्रमांक द्यावा.
उमेदवारांना अपंग आणि इतर आरक्षणांचा पर्याय पण दिलेला आहे. मदतनीसाची निकड असल्यास उमेदवार तत्संबंधी पण अर्ज करू शकतो.
उमेदवारांनी संबंधित घोषणापत्राचा नमुना नोंदणी नियम व सूचनापत्र tab मध्ये पाहावा .(तुमच्या अपंगत्वाचे प्रमाण ४०% व त्यापेक्षा जास्त असेल तरच तुम्हाला शुल्कातून सवलत आणि मदतनीसाचा पर्याय मिळेल.)
उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी आहे किंवा सीमाप्रांतातील ८६५ वादग्रस्त गावांतील रहिवासी आहे हे आधी घोषित करावे लागेल.
शैक्षणिक माहितीच्या जागी उमेदवाराने आपापली सविस्तर शैक्षणिक माहिती भरावी. बाराबी आणि दहावीची माहिती अनिवार्य आहे.
परिक्षेची पदवी कुठून मिळाली, मिळालेले गुण, कमाल गुण, उत्तीर्ण झालेले साल, विद्यापीठाचे नाव इ. माहिती सुद्धा टाकली जावी. त्यानुसार टक्केवारी काढली जाईल.
एकदा शैक्षणिक तपशिल प्रविष्ट केले की अर्जदारास पुढे या बटणावर क्लिक करावे लागेल, त्या बटणावर क्लिक केल्यानंतर अर्जदारांकडून पुष्टीची विनंती केली जाईल की त्यांनी ते बटण क्लिक केल्यास तपशील संपादित करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
त्यानंतरचा अर्ज प्रत्येक विभागानुसार आवश्यक त्या माहितीनुसार भरून घेतला जाईल. उमेदवाराला त्यानुसार माहिती द्यावी लागेल.
व्यावसायिक शिक्षणाबाबत उमेदवाराला त्याच्या पदविका, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाची माहिती द्यावी लागेल.
बारावी, दहावीसह संबंधित एक व्यावसायिक शिक्षण घेतलेले उमेदवार टीएआयटी परिक्षेसाठी पात्र असतील.
पुढे जाण्यासाठी अर्जदाराला परीक्षा दाखवा ऑप्शन्सवर क्लिक करावे लागेल. पुढे अर्जदाराने अर्ज करण्यासाठी "शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी- 2017" हा पर्याय निवडणे आवश्यक आहे त्यानंतर त्यास प्रोसिड या बटनावर क्लिक करावे लागेल.
प्राथमिक पदांकरिता किंवा माध्यमिक आणि प्राथमिक अशा दोन्ही पदांकरिता अर्ज करण्यासाठी उमेदवार टीइटी परिक्षा उत्तीर्ण असला पाहिजे.
उमेदवाराने टीइटी परिक्षेची आसन क्रमांक, उत्तीर्ण झालेले वर्ष, मिळालेले गुण, कमाल गुण इत्यादी माहिती नोंदणी करताना द्यावी लागेल.
उमेदवाराने परिक्षेचे हवे असलेले माध्यम निवडले पाहिजे उदाः मराठी, इंग्रजी आणि उर्दू.
उमेदवार नोंदणी अर्जामध्ये दिल्याप्रमाणे जिल्ह्यानुसार तीन प्राधान्यक्रम निवडू शकतो.
ह्यानंतर उमेदवाराने नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ऑनलाइन शुल्क भरणा करावा.
उमेदवाराने सगळ्या नियम व अटी वाचून मान्यता दर्शवण्यासाठी दिलेल्या जागी क्लिक करावे.
मान्यता दर्शविल्यानंतरच अर्ज दाखल करण्यासाठीचा सबमिट हा पर्याय उपलब्ध होईल.
उमेदवाराला त्याचा अर्ज डाऊनलोड किंवा प्रिंट करण्याचा पर्याय असेल.
अर्जातील माहितीचा प्रिव्ह्यू:
युजरनेम आणि पासवर्ड वापरून लॉगइन केल्यावर उमेदवार आपला संक्षिप्त अर्ज पाहू शकतो.
अर्ज प्रिंट करण्यासाठी "प्रिंट प्रिव्ह्यू" या पर्यायावर क्लिक करा.
ऑनलाईन भरणा:
उमेदवार क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड/एटीम पिन/इंटरनेट बँकिंग/वॅलेट/कॅश कार्ड/आयएमपीएस द्वारे शुल्क भरणा करू शकतात.
उमेदवार आपापल्या सोयीनुसार भरणा करू शकतात.
भरणा करण्याकरिता फक्त ऑनलाईन पर्याय उपलब्ध आहेत.
उमेदवाराला जर वीज पुरवठा किंवा इंटरनेट सेवा खंडित झाल्यामुळे शुल्क भरणा करता आला नाही तर त्याने पुन्हा लॉगइन करून भरणा प्रक्रिया पूर्ण करावी.
शुल्क भरणा झाल्यावर उमेदवाराला "भरणा यशस्वी" म्हणून संदेश मिळेल आणि झालेल्या व्यवहाराची सविस्तर माहिती अर्जामध्ये आपोआप येईल.
अर्जाची प्रिंट
उमेदवाराने अर्जाची एक प्रत आपल्याकडे ठेवावी.
अर्ज कुठल्याही शिक्षणाधिका-याकडे जमा करण्याची आवश्यकता नाही.