Tuesday 30 January 2018

5th & 8th Scholarship Exam Hall Ticket

इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परिक्षा आवेदनपत्र 


( Hall ticket ) 
वेबसाईट वर उपलब्ध झाल्याबाबत.

इयत्ता ५ वी व ८ वी साठी १८ फेब्रुवारी रोजी शिष्यवृत्ती परिक्षा होणार आहे 

त्यासाठी विद्यार्थी परिक्षा आवेदनपत्र वेबसाईट वर उपलब्ध  झालेले आहेत.

सर्वप्रथम खालील वेबसाईट login करा.
↘️↘️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️↙️↙️
नंतर school login करून विद्यार्थी यादी ओपन होईल.


_विद्यार्थ्यांच्या नावापुढे Admit card पर्याय आहे ._

_त्याला click केल्यावर परिक्षा आवेदनपत्र ओपन होईल._

_त्यामध्ये वरील बाजूस print option आहे._

_त्याला click करून print काढता येईल._

विद्यार्थ्यांसाठी व शाळेसाठी सुचना.

फक्त माहितीसाठी⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️
परीक्षार्थ्यांसाठी.

 सूचना 
1) _परीक्षार्थ्याने प्रत्येक पेपर सुरु होण्यापूर्वी ३० मिनिटे अगोदर परीक्षागृहात प्रवेशपत्रासह उपस्थित रहावे._
2) _उत्तरे नोंदविण्यास सुरवात करण्यापूर्वी उत्तरपत्रिकेवर आणि प्रश्नपत्रिकेच्या मुखपृष्ठावर छापलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात._
3) _उत्तरपत्रिकेवर आणि स्वाक्षरीपटावर विहित ठिकाणी प्रत्येक पेपरच्या वेळी परीक्षार्थ्याने स्वाक्षरी करावी._
4) _प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत इतर परीक्षार्थी, पर्यवेक्षक, केंद्रसंचालक यांचेशी पेपर चालू असताना चर्चा करू नये._
5) _कॅलक्युलेटर, मोबाईल, पुस्तके, इ. साहित्य परीक्षागृहात आणण्यास सक्त मनाई आहे._
6) _उत्तरे नोंदविण्यासाठी निळ्या किंवा काळ्या शाईच्या बॉलपेनचाच वापर करावा._
7)  _परीक्षार्थ्यास कार्बनलेस उत्तरपत्रिका देण्यात येणार आहे. पेपर संपल्यानंतर उत्तरपत्रिकेची Original Copy पर्यवेक्षकाकडे जमा करून उत्तरपत्रिकेची Candidate Copy व प्रश्नपत्रिका आपल्या सोबत घेऊन जाण्यास परीक्षार्थ्यास परवानगी आहे._
8) _कार्बनलेस उत्तरपत्रिकेवरील बैठक क्रमांकाच्या रकान्यात परीक्षार्थ्याचा बैठक क्रमांक छापण्यात आलेला नाही. तथापि उत्तरपत्रिकेवरील बारकोड क्रमांक हाच त्याचा बैठक क्रमांक आहे._
9) _उत्तरपत्रिकेवर परीक्षार्थ्याचा बैठक क्रमांक, माध्यम, सेमी इंग्रजी व प्रश्नपत्रिका संचकोड अचूकपणे नोंदवून त्याबाबतची वर्तुळे अचूकपणे रंगविणे आवश्यक आहे._
10) उत्तरपत्रिका संगणकावर _तपासली जाणार असल्याने ती फाटणार नाही चुरगळणार नाही याची दक्षता घ्यावी._
11) उत्तरपत्रिका फाटल्यामुळे _उत्तरपत्रिकेवर रंगविलेले पर्याय दिसत नसल्यास त्या प्रश्नांचे गुण दिले जाणार नाहीत._


शाळा व पालकांसाठी सूचना :-

1) _परीक्षेपूर्वी परीक्षार्थ्यांकडून प्रश्नपत्रिका सोडविण्याचा पुरेसा सराव करून घ्यावा._
2)_प्रश्नपत्रिकेत त्रुटी/चुका _आढळून आल्यास त्याबाबतचे निवेदन लेखी स्वरुपात न पाठवता संबंधित शाळेच्या लॉगीनमधून तात्पुरती उत्तरसूची संकेतस्थळावर प्रसिध्द झाल्यानंतर विहित मुदतीत ऑनलाईन पद्धतीनेच करावे._
3) _परीक्षेनंतर निकालाच्या कार्यवाहीचे टप्पे :- अंतरिम उत्तरसूची प्रसिध्द करणे -> आक्षेप मागवून अंतिम उत्तरसूची घोषित करणे -> अंतरिम (तात्पुरता) निकाल घोषित करणे –> त्यावर आक्षेप मागवून अंतिम निकाल व गुणवत्ता यादी घोषित करणे._
4)_परीक्षा _परिषदेच्या www.puppss.mscescholarshipexam.in या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिध्द केलेली माहिती व सूचना नियमितपणे काळजीपूर्वक वाचाव्यात._
5) _अनावश्यक पत्रव्यवहार अथवा अनावश्यक ईमेल्स परिषदेस पाठवू नयेत._
6 ) _परीक्षेच्या अंतिम निकालापर्यंत प्रवेशपत्र जतन करून ठेवावे._